भुजबळ राज्य कसं चालवावं हे मला शिकवू नका- राज - Marathi News 24taas.com

भुजबळ राज्य कसं चालवावं हे मला शिकवू नका- राज

www.24taas.com, मुंबई
 
'भुजबळांनी मला शिकवू नये कसे राज्य चालवावं', 'राज्य कसं चालवावं हे मला चागलंच माहिती आहे',  'टोलनाका बहुतेक भुजबळांची रोजीरोटी आहे वाटतं'. असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. भुजबळांच्या टीकेला राज यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. आज त्यांच्या निवास्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 
राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतले ठळक मुद्दे - 
 
- राज्य कसं चालवावं हे मला चागंल कळतं - राज
 
- भुजबळांनी मला सांगू नये कि राज्य कसं चालवायचं ते - राज
 
- टोलवसुलीत पारदर्शकता नाही - राज
 
- मला समजवण्याच्या भानगडीत पडू नका - राज
 
- रस्ते बांधणी साठी कॉन्ट्रक्ट दिलेल्या कंपनीचं काम काय केलीत ते चांगलचं ठाऊक आहे - राज
 
- महामार्गावर काय काम केलं आहे यांनी आजवर? - राज
 
- टोलनाक्यावरील वसूलीत करोडो रूपये रोज मिळतात - राज
 
- आजवर टोल नाक्याची वसूली केली गेली त्यात यांचा बांधकाम खर्च निघाला नाही का - राज
 
- टोल वसूली करून जनतेची फसवणूक होते आहे - राज
 
- रस्त्यांच्या दुरावस्थेला कंत्राटदार, PWD हे लोक जबाबदार आहेत - राज
 

- मुबंई-पुणे महामार्गावरील कामकाज हे योग्य केलेलं नाही - राज


- मी टोल घेण्याचा विरोधात नाही - राज

- टोल वसुलीबाबत खोटारडेपणा होत आहे - राज

- राज्यसरकारला टोलनाके सुरू करायचे असेल तर सुरू करू शकतात - राज

- पण यापुढे प्रत्येक टोलनाक्यावर मनसेचे ५० लोक उभे राहतील - राज

- प्रत्येक गाडीची आणि मिळणाऱ्या पैशाची मनसे मोजदाद करील - राज

- सोमवार पासून पुढील १५ दिवस टोलनाक्यावरील पैशाची मोजदाद करून किती आकडा होतो हे महाराष्ट्रासमोर स्पष्ट करण्यात येईल - राज

- या सरकारची धोरणचं स्पष्ट नाहीये - राज

- हम करे सो कायदा असं ह्या लोकचं वागणं आहे - राज

- टोल नाक्यामध्ये अतंर का पाळलं जातं नाही - राज

- उद्या गल्लीबोळातही टोलनाका सुरू करतील हे लोक - राज

- उद्यापासून मनसेचे कार्यकर्ते हे टोलनाक्यावर उभे राहतील गाड्या मोजतील - राज

- पण माझ्या या कार्यकर्त्यांना टोलनाक्यावरील लोकांनी काही व्यत्यय आणला तर यांचे परिणाम वाईट होतील - राज

- माझी लोकं शांतते काम करतील त्यांना त्रास दिला लक्षात ठेवा - राज

- त्यानंतर मात्र महाराष्ट्रात असा हंगामा उभा करीन तो कोणालाही रोखता येणार नाही - राज

- विरोधीपक्षाला सरकारने टाकलंय खिशात - राज

- आणि हे विरोधी पक्षाचे लोकही काही बोलत नाही, मूग गिळून गप्प बसलेत - राज

- विरोधक आपआपले टक्के घेऊन, तंगड्या वर करून झोपले आहेत, महाराष्ट्र भोगतोय - राज

- राष्ट्रपतीपद म्हणजे रबर स्टॅम्प आहे - राज

- राष्ट्रपतीपदावर जर सरकारमधले लोकच बसणार असतील तर त्याला काहीही अर्थ काही - राज

- राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकित मी कोणाही सोबत नसेन - राज

First Published: Friday, June 15, 2012, 19:06


comments powered by Disqus