Last Updated: Sunday, June 17, 2012, 12:40
www.24taas.com, मुंबई एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक यांच निलंबन रद्द करण्यात आलय. बेहिशेबी मालमत्ता जमावल्याचा त्यांच्यावर आरोप होता. या प्रकरणी दया नायकला अटकही झाली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून दया नायकची चौकशी सुरू होती. मात्र, तपासात आक्षेपार्ह काहीही न आढल्याने त्यांचं निलंबन रद्द करण्यात आले आहे.
आता लोकल आर्म्स मध्ये त्याची नियुक्ती करण्यात आलीय. मुंबईत एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखल्या जाणा-या दया नायकवर अनेक गंभीर आरोप लावण्यात आले होते. बेहिशेबी मालमत्तेबरोबरच मुंबईतल्या अंडरवर्ल्डशीही दया नायकचे संबंध असल्याचं बोललं जात होतं. मात्र, अनेक नामचिन गुंडांचा खातमा केल्याने दया नायक मुंबईमध्ये अनेक वर्ष प्रसिद्धीच्या झोतात होते.
पन्नासहून अधिक गुंडांना यमसदनी धाडून गुन्हेगारी जगतात खळबळ माजविणारा परंतु बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपाप्रकरणात अडकून पोलीस दलाबाहेर फेकला गेलेले ‘चकमक’फेम पोलीस अधिकारी दया नायक साडेसहा वर्षांच्या निलंबनानंतर अखेर शनिवारी पुन्हा एकदा मुंबई पोलीस दलात दाखल झाले. नायक हे मुंबई पोलिसांच्या हत्यारी दलात शनिवारी रूजू झाल्याचे खुद्द पोलीस आयुक्त अरुप पटनाईक यांनीच जाहीर केले.
१९९५च्या तुकडीतील अधिकारी असलेल्या नायक यांनी अल्पावधीतच ‘चकमक’फेम अशी आपली ओळख निर्माण केली. मात्र कर्नाटक येथे आपल्या आईच्या नावे बांधलेल्या शाळेचे २००६ मध्ये सुप्रसिध्द अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते उद्घाटन करणे त्यांना चांगलेच भोवले. एका पोलीस अधिकाऱ्याकडे शाळा बांधण्याएवढे पैसे आले कुठून? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला.
अल्पावधीत आपल्या कामगिरीने गुंडांचा कर्दनकाळ अशी ओळख बनविलेल्या नायक यांना बेहिशेबी मालमत्तेच्या वादाने पुरते नामोहरम केले व तो मुंबई पोलीस दलाबाहेर फेकला गेले. या प्रकरणी त्याच्यावर अटकेची कारवाई होऊन मुंबई पोलीस सेवेतून त्यांना निलंबित करण्यात आले. जामिनावर सुटल्यानंतर तर ते अज्ञातवासात गेले.
व्हिडिओ पाहा...
First Published: Sunday, June 17, 2012, 12:40