झी बिझनेस ऍवॉर्डचे वितरण - Marathi News 24taas.com

झी बिझनेस ऍवॉर्डचे वितरण

www.24taas.com, मुंबई
 
राष्ट्रपतीपदासाठी युपीएचे उमेदवार म्हणून प्रणव मुखर्जींचे नाव जाहीर झाल्यानंतर प्रथमच ते मुंबईत आले. झी बिझनेसच्या बेस्ट मार्केट ऍनॅलीस्ट ऍवॉर्ड सोहळ्यासाठी ते मुंबईत आलेत. झी बिझनेसतर्फे बेस्ट मार्केट एनालिस्ट अँवॉर्ड पुरस्कारानं भारतातल्या तज्ज्ञ मार्केट एक्सपर्टसचा गौरव करण्यात आला.
 
या कार्यक्रमासाठी प्रणवदा उपस्थित होते. या कार्यक्रमात लाईफ टाईम अँचिव्हमेंट पुरस्कारांचे वितरण झाले. उद्योजक उदय कोटक यांना इंडियन कॅपीटल मार्केटमधील योगदानासाठी लाईफ टाईम अँचिव्हमेंट पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
 
राकेश झुणझुणवाला यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना लाईफ टाईम अँचिव्हमेंट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. एस्सेल ग्रृपचे चेअरमन सुभाष चंद्रा यांनी प्रणव मुखर्जी यांच्या कामगिरीचं कौतुक केलं.
 
व्हिडिओ पाहा...

First Published: Sunday, June 17, 2012, 12:49


comments powered by Disqus