Last Updated: Tuesday, June 19, 2012, 08:25
www.24taas.com, मुंबई शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राष्ट्रपतीपदासाठी प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा जाहीर केलाय. शिवसेना काय भूमिका घेते याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष होते. रात्री उशिरा शिवसेनाप्रमुखांनी एक निवेदन प्रसिद्ध करुन राष्ट्रपतीपदासाठी योग्य उमेदवार म्हणून प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला.
तलवार म्यानात नसताना उगाच मुठीला हात घालून शौर्यत्व व वीरत्व दाखवण्याचा फुका प्रयत्न करु नये, असं बाळासाहेबांनी म्हटलंय. राष्ट्रपतीपदासाठी चाललेला खेळखंडोबा शोभनीय नाही. राजकीय स्वार्थासाठी देशाची अब्रू चव्हाट्यावर मांडली जात आहे. ज्यांच्या आडात नाही तेही आपले पोहरे टाकून राष्ट्रपतीपदासाठी तिरीमिरीनं उभे राहतात. केवळ देशहितासाठी हा विचार मांडीत आहे. मुखर्जींना राष्ट्रपतीपदासाठी एकमुखानं पाठिंबा द्या आणि 'हम सब एक है' हे जगाला दाखवून द्या, असं शिवसेनाप्रमुखांनी निवेदनात म्हटलंय.
व्हिडिओ पाह..
First Published: Tuesday, June 19, 2012, 08:25