शिवसेनेचा आज ४६ वा वर्धापन - Marathi News 24taas.com

शिवसेनेचा आज ४६ वा वर्धापन

www.24taas.com, मुंबई
 
मराठी माणसाचा आवाज बुलंद करणा-या आणि ज्वलंत हिंदुत्वाची मशाल अखंड तेवत ठेवणा-या शिवसेनेचा आज ४६ वा वर्धापन दिन आहे. मुंबईतल्या किंग्जसर्कल इथल्या षण्मुखानंद सभागृहात सायंकाळी सहा वाजता एका शानदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आले आहे.
 
शिवसेनेचा वर्धापन दिन मोठ्या जल्लोषात आणि दिमाखात साजरा करण्याचं नियोजन कार्यकर्त्य़ांनी केलंय. षण्मुखानंद सभागृहात शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे तसेच शिवसेनेचे सर्व नेते, उपनेते या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
 
सोहळ्याच्या पूर्वाधात शिवसेनेचा संघटनात्मक कार्यक्रम होईल. त्यानंतर प्रशांत दामले आणि रिमा लागू यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'सासू माझी ढॉसू' या विनोदी नाटकाचा प्रयोग होईल, असं शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून कळवण्यात आलंय.

First Published: Tuesday, June 19, 2012, 15:18


comments powered by Disqus