Last Updated: Wednesday, June 20, 2012, 12:44
www.24taas.com, मुंबई शिवसेनेत एकही नासका आंबा नाही, अशी भाषणाची सुरूवात करून शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
षष्मुखानंद येथे आय़ोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी सर्वप्रथम राज ठाकरे यांना निशाणा केला. ते म्हणाले, आज शिवसेनेत कोणताही नासका आंबा नाही. सेनेत सगळं बावन्नकशी सोनं आहे.
तसेच त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत शिवसेनेच्या भूमिकेचे समर्थन केले. हो आम्ही प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला आहे. शिवसेनाप्रमुखांनी स्वतः हा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने देशाची नासाडी केली आहे, देशभरात काँग्रेसविरोधी लाट आहे. परंतु, आपण राष्ट्रपतीपदासाठी अद्याप एनडीए एक उमेदवार देऊन शकत नाही, ही शोकांतिका आहे.
शंभरकोटीच्या देशातून आपल्याला राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षाला एक उमेदवार मिळू शकत नाही. विरोधपक्ष कमकूवत बनला आहे. दिल्ली जिंकायची असेल तर आपल्याला कणखर बनायला हवे, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
सध्या आपण निवडणूकग्रस्त झालो आहोत. आज पोट निवडणूक तर उद्या पाट निवडणूक कोणती ना कोणती निवडणूक सुरूच आहे. आगामी निवडणुकीत महाराष्ट्र विधानसभेवर भगवा निळा फडकविणार ही शपथ आज आपण घेऊ या असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिवसैनिकांना केले.
First Published: Wednesday, June 20, 2012, 12:44