पाऊस गायब, मुंबईकर घामाने हैराण - Marathi News 24taas.com

पाऊस गायब, मुंबईकर घामाने हैराण

www.24taas.com, मुंबई
 
रविवारी मुंबईत मान्सून बरसला खरा, पण दुस-याच दिवसापासून तो पुन्हा गायब झाला. रविवारी चिंब भिजलेले मुंबईकर आता घामाच्या धारांनी हैराण आहेत.
 
मान्सून गेला कुठे असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. रविवारी वन-डे खेळून मान्सून गायब झालाय. चीनमधल्या वादळामुळे मान्सूनवर परिणाम
 
झाल्याचं बोललं जातंय. चीनमधल्या तलीम वादळाने तिकडे मोठा पूरही आला होता.  या वादळानं मान्सूनला अडथळा निर्माण केल्याचं म्हटलं जातंय. तर हवामानातील बदलामुळे मान्सून कमजोर झाल्याचं हवामान खात्यानं म्हटलंय.
 
काही दिवसांत मान्सून पुन्हा सक्रीय होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. पण सध्या तरी मान्सून गायब झाल्यानं मुंबईकर हैराण आहेत. शहरी भागात लोक उकाड्यानं हैराण असले करी राज्याच्या ज्या भागात पाऊस झाला नाही तिथले शेतकरीही चिंतेत आहेत.
 
व्हिडिओ पाहा..

 
 

First Published: Wednesday, June 20, 2012, 09:58


comments powered by Disqus