Last Updated: Wednesday, June 20, 2012, 16:15
www.24taas.com, मुंबई राज्यात दोन दिवसांत गुटखाबंदी होणार आहे. राज्याचे अन्न आणि औषध प्रशासनमंत्री मनोहर नाईक यांनी ही माहिती दिलीय. अन्न आणि औषध प्रशासन विभागानं हा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत ठेवला होता. दोन दिवसांत याबाबत औपचारिक घोषणा होणार आहे.
व्यसनाच्या विळख्यातून तरुण पिढीची सुटका करण्यासाठी राज्यात लवकरच गुटखा व पान मसाल्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला जाईल, असं दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी म्हटलं होतं. राज्य सरकारनं गुटखा आणि पानमसाल्यावर बंदी घालणा-या कायद्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर केला. आणि तो संमतही झालाय. अधिकृत घोषणा मात्र दोन दिवसानंतर होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे गुटखा विक्री आणि उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळं सरकारचा १०० कोटींचा महसूल बुडणार आहे.
First Published: Wednesday, June 20, 2012, 16:15