प्रीतमकुमार शेगावकर यांचे निधन - Marathi News 24taas.com

प्रीतमकुमार शेगावकर यांचे निधन

www.24taas.com,मुंबई
 
रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रीतमकुमार शेगावकर यांचे निधन झालं आहे. शेगावकरांचे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ह्यदयविकारानं निधन झाले.
 
माजी राज्यमंत्री असलेले शेगावकर हे रामदास आठवले यांचे निकटवर्तीय होते. तसच पीपल एज्युकेशन सोसायटीचे ते नवनिर्वाचित अध्यक्ष होते. पीईएसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याची माहिती देण्यासाठी शनिवारी शेगावकर यांनी मुंबईत आनंद भवन या संस्थेच्या कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती. पत्रकारांना माहिती देत असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. लगेचच त्यांना सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
 
तिथे उपचार केल्यानंतर त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं. मात्र त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नाही. आज सकाळी त्यांचं निधन झालं. रिपब्लकीन पक्ष मराठवाड्यात रूजवण्यात शेगावकरांचा मोठा वाटा राहिलाय.
 

First Published: Thursday, June 21, 2012, 10:56


comments powered by Disqus