Last Updated: Thursday, June 21, 2012, 13:21
www.24taas.com, मुंबई 
इंडियन आयडॉलच्या पहिल्या पर्वातील राहुल वैद्यच्या घरात चोरी झाली आहे. लोखंडवाला कॉम्पलेक्स मधील त्याच्या घरी चोरी झाली आहे.राहुल आणि त्याचे आई-वडील युरोप सहलीवरून घरी परतले तेव्हा त्यांना चोरी झाली असल्याचे आढळून आले. ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
राहलुच्या घरात घरकाम करणारी महिला किंवा ड्रायव्हर यांच्यापैकी कोणीतरी ही चोरी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. चोरांनी मुख्य दरवाजाचे कुलूप उघडून घरात प्रवेश केला, चोरट्यांनी एक लाखाची रोकड आणि आजीच्या आर्टीफिशीअल ज्वेलरीवर डल्ला मारला आहे.
ओशिवरा पोलिसांचे म्हणणे आहे की, मुख्य दरवाजा न तोडता चोर आत घुसले याचा अर्थ त्यांना या कुटूंबाबद्दल आणि घराबद्दल पक्की माहिती होती. त्या दिशेने तपास सुरु आहे.
First Published: Thursday, June 21, 2012, 13:21