आगीचं सत्य आता सगळं बाहेर येणार... - Marathi News 24taas.com

आगीचं सत्य आता सगळं बाहेर येणार...

www.24taas.com, मुंबई
 
मंत्रालयात लागलेल्या आगीची क्राईम ब्रांचनी चौकशी सुरू केली आहे. त्यासाठी क्राईम ब्रांचची टीम चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर तपास करत आहेत.  मात्र सहाव्या आणि सातव्या मजल्यावर उष्णता जास्त असल्यामुळे फायर ब्रिगेड कुलिंग ऑपरेशन करत आहेत.
 
क्राईम ब्रांचच्या चार टीम तपासा करता क्राईम ब्रांचनी मंत्रालयातील सीसीटीव्ही आणि हार्ड डिस्क ताब्यात घेतले आहेत. आता या सगळ्याचीच सीबीआय चौकशी होणार आहे.
 
ज्या मंत्रालयातून संबंध राज्यातल्या जनतेची कामं हाताळली जाताता ते मंत्रालयचं सुरक्षित नाही, याची प्रचिती गुरुवारच्या मंत्रालयाला लागलेल्या आगीमुळे सगळ्यांनाच आली. त्यानंतर आज सकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तातडीनं कॅबिनेटची बैठक बोलावली होती. मंत्रालयाचं स्ट्रक्चरल ऑडिट होईपर्यंत मंत्रालय बंद राहील, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कॅबिनेट बैठकीनंतर स्पष्ट केलं आहे.
 
 
 

First Published: Friday, June 22, 2012, 19:31


comments powered by Disqus