Last Updated: Saturday, June 23, 2012, 19:43
www.24taas.com, मुंबई 
मंत्रालयातल्या अग्निकांडात एक मांजर बचावलं आहे. मंत्रालयात उंदरांचा सुळसुळाट असल्यानं मांजरी बऱ्याच आहेत. अग्नितांडवात त्यांची पळापळ झाली. पण एक मांजर अग्निकांडात अडकलं होतं.
इमारतीच्या चौथ्या मजल्यावर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना अतिरीक्त मुख्य सचिव जे.एच.सहारिया यांच्या दालनापुढं एक मांजर आढळलं. चेहऱ्यावर आणि डोळ्यात करुण भाव असलेलं मांजर आश्चर्यकाररीत्या बचावले.
इतक्या मोठ्या आगीमध्ये हे मांजर वाचल्याने मंत्रालयातील कर्मचारी ही आश्चर्य व्यक्त करीत आहेत. पण हे मांजर मंत्रालयात पाळतात कारण की, मंत्रालयात खूप उंदीर झाले आहेत.
First Published: Saturday, June 23, 2012, 19:43