मोरे कुटुंबियांचे मुख्यमंत्र्यांकडून सांत्वन - Marathi News 24taas.com

मोरे कुटुंबियांचे मुख्यमंत्र्यांकडून सांत्वन

 www.24taas.com, मुंबई
 
मंत्रालयात लागलेल्या आगीत मुख्यमंत्र्यांचे जमादार मोहन मोरे आणि तुकाराम मोरे यांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोघांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केलं.
 
तुकाराम मोरे यांच्या कुटुंबियांची विरारमध्ये जाऊन भेट घेतली. मोरे हे मुख्यमंत्र्यांचे चोपदार म्हणून काम पहात होते. तसंच दिवंगत मोहन मोरे यांच्या मीरा रोड येथील घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचंही सांत्वन केलं. दोन्हीही दिवंगत कर्मचा-यांच्या कुटुंबियांना सरकारतर्फे योग्य ती मदत केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. मोहन मोरे यांच्या दोन्ही मुलांची जबाबदारी मी स्वतः घेईन, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय
 
मंत्रालयाला लागलेल्या अग्निकांडानंतर दोघांचेही मृतदेह मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर आढळून आले होते..

First Published: Sunday, June 24, 2012, 19:31


comments powered by Disqus