Last Updated: Monday, June 25, 2012, 11:12
www.24taas.com, मुंबई तीन वर्षांपासून फरार असलेला वादग्रस्त बडतर्फ अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनोज लोहारला मुंबई क्राईम ब्रांचनं अटक केली आहे. लोहारला अटक करून तात्काळ सीआयडीच्या ताब्यात देण्यात आले आहे.
माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर उत्तमराव महाजन यांच्याकडून २५ लाखांची खंडणी मागितली होती. तसंच त्यांचं अपहरणही केलं होतं. याप्रकरणी महाजन यांनी ३० जून २००९ मध्ये चाळगीसगांव पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यावरुन तत्कालीन पोलीस अधीक्षक संतोष रस्तोगी यांनी केलेल्या चौकशीनंतर मनोज लोहार, पीएसआय विश्वास निंबाळकर तसंच धीरज येवले यांच्याविरोधात १६ जुलै २००९ मध्ये चाळीसगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
लोहासरसह तिघांविरोधात खंडणी आणि अपहरणाचा जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र मनोज लोहार फरार होता. तसंच याप्रकरणी सीआयडी चौकशीही सुरू होती.
First Published: Monday, June 25, 2012, 11:12