Last Updated: Tuesday, June 26, 2012, 08:33
www.24taas.com, मुंबई आदर्श घोटाळ्याच्या सुनावणीत नवीन ट्विस्ट आलाय. आदर्श आयोगासमोर साक्ष देताना माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी विलासराव देशमुखांकडे बोट दाखवलंय. आदर्श सोसायटीला जमीन देण्याचा निर्णय विलासराव देशमुख सरकारचा असल्याची साक्ष शिंदेंनी दिलीय.
‘आदर्श सोसायटीसाठी जागा देण्याचा निर्णय आधीच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला होता. आदर्शसाठीचं लेटर ऑफ इंटेन्ट १८ जानेवारी २००३ ला मंजूर झालं होतं, त्यावेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. मी फक्त सही केलीय’, अशी साक्ष शिंदेंनी दिलीय.
तब्बल ७ तास सुशीलकुमार शिंदेंची साक्ष झाली. शिंदेंनी जेव्हा लेटर ऑफ अलॉटमेंटवर सही केली, तेव्हा आदर्श सोसायटीकडे वन आणि पर्यावरण मंत्रालयाची एनओसी होती की नाही? याबद्दल काही आठवत नसल्याचं सांगितलं. आता मंगळवारी विलासराव देशमुखांची साक्ष होतेय. यावेळी ते काय साक्ष देतायत याकडे सगळ्यांचच लक्ष राहील.
.
First Published: Tuesday, June 26, 2012, 08:33