Last Updated: Tuesday, June 26, 2012, 11:12
www.24taas.com, मुंबई आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री विलासराव देशमुख यांची साक्ष नोंदवण्यात येणार आहे. त्यासाठी देशमुख आज चौकशी आयोगासमोर हजर राहणार आहेत. काल सुशीलकुमार शिंदेंची साक्ष नोंदवण्यात आली. त्यांनी आपल्या साक्षीत आधीच्या मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवत संपूर्ण जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळं आता विलासराव देशमुख काय भूमिका घेतात याकडं लक्ष लागले आहे.
सुशीलकुमार शिंदे यांनी विलासरावांकडे बोट दाखवल्यामुळे या प्रकरणात ट्विस्ट आलाय. त्यामुळे आता विलासरावांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.आदर्श घोटाळ्याच्या तपासात आरोप- प्रत्यारोपं थांबायचं नाव घेत नाहीत. सोमवारी माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदेंनी चौकशी आयोगासमोर साक्ष दिली. साक्षीदरम्यान शिंदेंनी या घोटाळ्याप्रकरणी विलासराव देशमुखांकडे बोट दाखवलंय.
आदर्श सोसायटीसाठी जागा देण्याचा निर्णय आधीच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला होता. आदर्शसाठीचं लेटर ऑफ इंटेन्ट 18 जानेवारी 2003 ला मंजूर झालं होतं, त्यावेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. मी फक्त सही केलीय, अशी साक्ष शिंदेंनी दिलीय. तब्बल सात तास सुशीलकुमार शिंदेंची साक्ष झाली...शिंदेंनी जेव्हा लेटर ऑफ अलॉटमेंटवर सही केली, तेव्हा आदर्श सोसायटीकडे वन आणि पर्यावरण मंत्रालयाची एनओसी होती की नाही याबद्दल काही आठवत नसल्याचं सांगितलं. आणि बोट दाखवलंय ते विलासरावांकडे. मंगळवारी विलासराव देशमुखांची साक्ष होतेय. आता पाहायचं विलासराव देशमुख काय साक्ष देणार ते.
First Published: Tuesday, June 26, 2012, 11:12