Last Updated: Sunday, October 2, 2011, 12:28
झी 24 तास वेब टीम, मुबंई मुंबई महानगरपालिकेच्या मध्य वैतरणा प्रकल्पातील जलवाहिनी दुरुस्तीचं काम सुरु असल्यामुळे आज आणि उद्या संपूर्ण मुंबईत दहा टक्के पाणी कपात केली जाणार आहे. आज सकाळी १० वाजल्यापासून ते उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत ही पाणीकपात सुरु राहिल.

मध्य वैतरणा पाणीपुरवठा प्रकल्पाच्या कामासाठी उर्ध्व वैतरणा ही मुख्य पाइपलाईन मध्य वैतरणा पाइपलाईनला दोन ठिकाणी जोडण्यात येणार आहे. यामुळे दोन दिवस पाणीकपात असणार आहे.
अंधेरी येथील ना. सी. फडके मार्गावरील उड्डाणपुलाखाली असणारी एक हजार ३५० मिमी. व्यासाच्या जलवाहिनीची झडप बदलण्याचे काम आज करण्यात येणार आहे. त्यामुळे पालिकेच्या के/पश्चिम विभागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. पाणीकपातीमुळे उद्या ११ वाजेपर्यंत मुंबईकरांनी पाणी जपूनच वापरावं असं आवाहन पाणी खात्याने केलं आहे.
First Published: Sunday, October 2, 2011, 12:28