Last Updated: Saturday, December 10, 2011, 12:40
झी २४ तास वेब टीम, मुंबई
मुंबई विमानतळावर बेल्जियमहून आयात झालेले पाच कोटी ७० लाख रुपयांचे हिरे जप्त करण्यात आले आहेत. केंद्रीय सीमाशुल्क विभागाने ही कारवाई केली.
सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर एका कंपनीच्या नावे आलेल्या सामानाची तपासणी केली. यावेळी हिऱ्यांचा साठा सापडला. सीमाशुल्क वाचविण्यासाठी हा साठा लपवून आणला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
विमानतळावर बेल्जियमहून येणाऱ्या आयात मालात पाच कोटी ७० लाख रुपये किंमत असलेले कट आणि पॉलिश हिरे आल्याची माहिती केंद्रीय सीमाशुल्क विभागाला मिळाली होती.
First Published: Saturday, December 10, 2011, 12:40