बारबालेचा केला प्रियकराने खून - Marathi News 24taas.com

बारबालेचा केला प्रियकराने खून


झी २४ तास वेब टीम, मीरारोड
 
मीरारोड येथील बारबालेच्या हत्येमुळे मीरारोड परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. मीरारोडमध्ये एका बारबालेची हत्या करण्यात आली आहे. कांचन असं या बारबालेचं नाव असुन तिच्या प्रियकरानेच तिची हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं.
 
मीरारोडमधल्या रॉयलपार्क परिसरात ही बारबाला रहात होती. आरोपी विजय गैसर बिंदीया बारमध्ये कायम जात असे आणि कंचनवर मोठ्याप्रमाणावर पैसे उधळत असे.
 
तिथेच त्या दोघांचं प्रेम झालं. हत्या कोणत्या कारणामुळे झाली हे अद्याप समोर आलं नसलं तरी हत्येच्या आदल्या रात्री त्यांच्यात भांडण झालं होतं असं शेजाऱ्यांनी सांगितलं. विजयने तिची हत्या केल्यावर तो स्वतःच पोलीस ठाण्यात दाखल झाला आणि आपला गुन्हा त्याने कबुल केला. आज त्याला कोर्टात हजर केलं.

First Published: Saturday, December 10, 2011, 12:22


comments powered by Disqus