Last Updated: Thursday, June 28, 2012, 10:52
www.24taa.com,मुंबई मुंबईत रात्रभर बरसलेल्या पावसाचा लोकल वाहतुकीवर परिणाम झालाय. मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल एक तास उशिरानं धावत आहे. तर हार्बर रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम झालाय. पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये जोरदार पावसाच्या हजेरीनं अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरूवात झालीय.
गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचं मुंबईत पुन्हा जोरदार आगमन झालंय. शहरात रात्रभर सुरू असलेल्या पावसानं पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्येही जोरदार हजेरी लावलीय़. पश्चिम उपनगरांमधल्या काही सखल भागांत पाणी साचलंय. तर मध्य आणि हार्बर लोकल सेवेवरही पावसाचा परिणाम झालाय.
मध्य रेल्वेची लोकल वाहतूक अर्धा तास उशिराने धावत आहे. तर हार्बर रेल्वे 15 ते 20 उशिराने सुरू आहे. ठाणे शहरातही पावसाच्या सरी बरसल्या आहेत. तर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे.
कोकणात मुसळधार, जमीन खचलीरत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. राजापूर, खेड, दापोली भागात पावसाचा जोर आहे. तर राजापूर - सौदळ रेल्वे रूळानजीकची जमीन खचलीय. तिथं दहा ते बारा फुटांचा खड्डा पडल्यानं रूळाला धोका निर्माण झालाय. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, मालवण, वेंगुर्ला आणि देवगडमध्येही पावसानं दमदार हजेरी लावलीय.
व्हिडिओ पाहा..
First Published: Thursday, June 28, 2012, 10:52