Last Updated: Thursday, June 28, 2012, 13:06
www.24taas.com, मुंबई गिरणी कामगारांच्या घरांच्या लॉटरी प्रक्रियेला सुरूवात झालीय. मात्र ही लॉटरी थांबण्यासाठी दोन ते अडीच हजार गिरणी कामगारांनी एस व्ही रोडवर मोर्चा काढला.
लॉटरी बंद करण्याची मागणी करत सर्व गिरणी कामगारांना घरं देण्याची मागणी करण्यात आली. गिरणी कामगार सेना आणि गिरणी कामगार कल्याणकारी संघटनेसह सहा संघटनांनी या मोर्चात सहभाग घेतला. या मोर्चामुळं एस व्ही रोडवरील वाहतूक खोळंबली. तर दुसरीकडं लॉटरी काढण्याची प्रक्रिया मात्र सुरूच आहे.
आतापर्यंत चार गिरण्यांची लॉटरी काढण्यात आलीय. कोहिनूर नंबर तीन, ज्युपिटर आणि इंडिया युनायटेड नंबर दोन या गिरण्यांच्या जागेवरील घरांची लॉटरी काढण्यात आलीय. ६ हजार ९२५ घरांसाठी १९ गिरण्यांमधल्या ४८ हजार ९३३ कामगारांसाठी ही लॉटरी काढली जातेय.
First Published: Thursday, June 28, 2012, 13:06