Last Updated: Sunday, December 11, 2011, 03:51
झी २४ तास वेब टीम, मुंबई मुंबईतल्या सगळ्यात मोठ्या महिला ड्रग्ज माफियाला अटक करण्यात अखेर पोलीसांना यश आलंय. सावित्री असं या महिलेचं नाव आहे. ही महिला गेल्या पंचवीस वर्षापासून ड्रग्स विकायची. दररोज एक कोटींचे ड्रग्स विकणाऱ्या ह्या ड्रग्स माफियाचे टार्गेट होते. शाळा आणि कॉलेजची अल्पवयीन मुलं.
या सावित्री नामक कित्येक तरूण ड्रग्सच्या आहारी गेलेत. गेल्या पंचवीस वर्षापासून ड्रग्सचा व्यापार करत असलेल्या या सावित्रीपर्यंत पोलिसांचे हात पोहचलं नव्हते. परंतु शनिवारी सावित्री आपल्या साथीदारांना हेरॉईन नावाचा अमली पदार्थ देण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीसांना लागली आणि पोलिसांनी सापळा रचून ड्रग्स माफिया सावित्रीला अटक केली.
पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार सावित्री दररोज तब्बल एक कोटी रुपयांच्या ड्रग्सची विक्री करायची. मुंबईच्या कानाकोपऱ्यात तिच्या टोळीचे तस्कर ड्रग्जचा पुरवठा करायचे. शाळा, कॉलेज, पब, पंचतारांकित हॉटेल्समध्ये सावित्री ड्रग्स पुरवत असल्याची माहिती समोर येत आहे. सावित्री ड्रग्स कुठुन आणायची, मुंबईतील हिचे साथीदार कोण कोण आहे, ह्याचा तपास पोलीस करतीलही. मात्र इतकी वर्षे तिच्यापर्यंत पोलीस कसे काय पोहचू शकले नाहीत, ही शंका निर्माण होते.
First Published: Sunday, December 11, 2011, 03:51