Last Updated: Friday, June 29, 2012, 00:01
www.24taas.com, मुंबई 
उद्योजकतेच्या क्षेत्रात प्रतिष्ठेचा समाजाला जाणारा डी.एस.के. सेल्फ मेड Man पुरस्कार मेत्रेय ग्रुपच्या प्रमुख वर्षा सत्पाळकर यांना प्रदान करण्यात आला आहे.
पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा पुरस्कार वितरण सोहळा झाला. ज्येष्ठ उद्योजिका शशीताई किर्लोस्कर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. झी २४ तासचे मुख्य संपादक डॉ.उदय निरगुडकर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.
स्वकर्तुत्वावर उद्योजकतेच्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या उद्योजकांना हा पुरस्कार देण्यात येतो. प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी.एस.कुलकर्णी यांच्या डी.एस.के. फौंडेशन च्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो.
First Published: Friday, June 29, 2012, 00:01