दुबार पेरणीचं संकट; सरकारला उशीराचं शहाणपण - Marathi News 24taas.com

दुबार पेरणीचं संकट; सरकारला उशीराचं शहाणपण

www.24taas.com, मुंबई
 
पावसानं दडी मारल्यामुळं राज्यातल्या अनेक भागांत शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलंय. गेल्या काही वर्षांपासून बळीराजाला या संकटाला सामोरं जावं लागतंय. हवामानाचा वारंवार चुकणारा अंदाज आणि शासनाची सक्षम पर्यायी व्यवस्था उभारण्यासाठी होत असलेली दिरंगाई याला कारणीभूत ठरलीय. मात्र, यावर उपाय काढण्यासाठी शासनाला नेहमीप्रमाणे उशिराचं शहाणपण सूचलंय.
 
राज्यात दुबार पेरणीचं संकट ओढवल्यास पर्यायी व्यवस्था तयार असल्याचं कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय. कृषी मंत्र्यानी हवामानाचा अचूक अंदाज वर्तवण्यासाठी राज्यात २१०० ऑटो वेदर स्टेशन्स उभारणार असल्याची घोषणा केलीय. राज्यात अनेक ठिकाणी पेरणी झाल्यानंतर आता पर्यायी व्यवस्था उभारण्याची उपरती आलीय. यामुळं कृषी धोरणाच्या बाबतीच सरकारचे नेहमीप्रमाणेच वराती मागून घोडे निघाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
 
.

First Published: Friday, June 29, 2012, 10:46


comments powered by Disqus