Last Updated: Friday, June 29, 2012, 12:07
www.24taas.com, मुंबई २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात पकडला गेलेला एकमेव जिवंत आरोपी अजमल कसाब यानं, लष्कर-ए-तोयबाशी संबंधित दहशतवादी अबू हमजा याच्या अटकेची बातमी ऐकली आणि त्यामुळे तो अस्वस्थ झालाय.
२००८ साली झालेल्या मुंबईवरच्या दहशतवादी हल्यात पाकिस्तानी नागरिक अजमल कसाब पकडला गेला. त्याला फाशीची शिक्षा सुनावली गेलीय. मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात त्याला ठेवलं गेलंय. सध्या हा खटला सुप्रीम कोर्टात आहे. याच प्रकरणात नुकताच पकडल्या गेलेल्या अबू हमजाचाही हात असल्याचा पोलिसांचा संशय खरा ठरलाय. अबू हमजा हा बीडचा रहिवासी आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या दहशतवाद्यांना जिंदाल हिंदी भाषा शिकवत होता, त्यामध्ये भारताची राष्ट्रभाषा शिकणारा कसाबही सामील होता.
तुरुंगातील सुत्रांच्या माहितीनुसार, जेव्हा कसाबला अबू हमजा पकडला गेल्याची बातमी समजली तेव्हा त्याची उत्सुकता त्याच्याबद्दल ऐकण्यासाठी कसाबची उत्सुकता वाढली. एकापाठोपाठ एक प्रश्न विचारायला त्यानं सुरुवात केली. यावेळी आश्चर्य व्यक्त करत कसाबनं, ‘अबूला केव्हा आणि कुठे पकडले, तो एकटाच होता की त्याच्यासोबत आणखीही कोणी होतं’. एवढंच विचारून कसाब थांबला नाही तर ‘त्याला मुंबईमध्ये आणलं जाणार आहे का? आणि याच तुरुंगात ठेवलं जाईल का?’ याचीही कसाबला उत्सुकता होती.
.
First Published: Friday, June 29, 2012, 12:07