मुंबईत १५ पदवीधर उमेदवार रिंगणात - Marathi News 24taas.com

मुंबईत १५ पदवीधर उमेदवार रिंगणात

www.24taas.com, मुंबई
 
मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात सोमवारी मतदान होणार आहे. शिक्षक मतदारसंघात एकूण १५ उमेदवार आहेत. त्यात लोकभारतीचे कपील पाटील, भाजप बंडखोर आणि शिवसेना पुरस्कृत उमेदवार मनीषा कायंदे, भाजपचे शरद यादव यांच्यात मुख्य लढत होणार आहे. मनसेचे संजय चित्रेही नशीब आजमावत आहेत.
 
मुंबई आणि उपनगरात एकूण तेवीस हजार शिक्षक आहेत. तर मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार डॉ. दीपक सावंत आणि लोकसत्ता पार्टीचे सुरेंद्र श्रीवास्तव यांच्यात प्रमुख लढत होतेय. या मतदारसंघात एकूण ९३ हजार मतदारांनी नोंदणी केलीय. तर दीपक सावंत यांचा विजय निश्चीत मानला जात आहे.
 
दरम्यान, मनसेने आपला उमेदवार रिंगणात उतरविल्याने या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. शिक्षक मतदार संघासाठी प्रथमच मनसे रिंगणात आहे. त्यामुळे मनसेचा उमेदवार किती मते घेतो याचीही उत्सुकता आहे. मनसेच्या उमेदवारीमुळे कोणाचा मार्ग सुकर होणार याचीही चर्चा रंगू लागली आहे.

First Published: Sunday, July 1, 2012, 12:35


comments powered by Disqus