'मिसाइल मॅन'वर शिवसेनाप्रमुखांचं मिसाइल - Marathi News 24taas.com

'मिसाइल मॅन'वर शिवसेनाप्रमुखांचं मिसाइल

www.24taas.com, मुंबई
 
माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी त्यांच्या ‘टर्निंग पॉइंट’ या आत्मचरित्रात सोनिया गांधींबाबत केलेल्या खुलाशावरून वाद वाढतोच आहे. आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनीही कलमांवर त्यांच्या खुलावावरून टीकास्त्र सोडलंय.
 
सोनियांना पंतप्रधान बनवण्यापासून रोखणारा तो मी नव्हेच असा खुलासा कलाम यांना दहा वर्षांपूर्वी करता आला असता, तेव्हा तो का केला नाही असा सवाल बाळासाहेबांनी सामनाच्या संपादकीयातून विचारला आहे. स्वार्थी हेतूनंच कलामांनी हा खुलासा तेव्हा केला नाही, अशी टीका ठाकरेंनी केली आहे. सोनियांबाबत त्यांनी केलेल्या स्फोटानं देशाच्या इज्जतीचे धिंडवडे निघाल्याची टीका बाळासाहेबांनी केली आहे.
 
डॉ. कलाम यांच्या कृत्याची ‘पादरे स्फोट’ अशी अवहेलना करत यापुढे त्यांना ‘मिसाइल मॅन’ म्हणू नये अशी सूचनाही केली आहे. विदेशी वंशाच्या व्यक्तीस रोखण्याची ताकद कलाम यांच्यात नव्हती. अशा व्यक्तीने खरंच ‘अणुस्फोट’ घडविला असेल काय अशी शंका उपस्थित केली आहे.

First Published: Monday, July 2, 2012, 14:48


comments powered by Disqus