Last Updated: Monday, July 2, 2012, 21:30
www.24taas.com, नवी दिल्लीटेलिकॉम मंत्रिगटाच्या अध्यक्षपदावरुन शरद पवार पायउतार झाले आहेत. याबाबतची विनंती केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधानांकडे केली होती. पंतप्रधानांना पत्र लिहून त्यांनी ही विनंती केली होती. पंतप्रधानांनी ही विनंती मान्य केलीय..
यापूर्वी या प्रकरणी नाहक आरोप झाल्याने पवारांनी नाराजी व्यक्त करत, या सर्व प्रकरणापासून दूर राहण्याची इच्छा पत्रातून व्यक्त केलीय. 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी कोर्टानं नव्यानं स्पेक्ट्रम वितरण करावे, असे आदेश दिले आहेत.
2 जी आणि 3 जी स्पेक्ट्रमचे नव्याने वितरण होणार आहे. या वितरण प्रक्रियेच्या वादापासून दूर राहण्याची इच्छा पवारांनी व्यक्त केलीय.
First Published: Monday, July 2, 2012, 21:30