सगळ्यासमोर 'बलात्कार' तरीही सारे गप्पच.... - Marathi News 24taas.com

सगळ्यासमोर 'बलात्कार' तरीही सारे गप्पच....

www.24taas.com, मुंबई
 
अकरा वर्षांच्या मुलीला तिच्या आई-वडिलांना शस्त्राचा धाक दाखवून पळविणार्‍या व त्यानंतर त्या बालिकेवर अमानुष बलात्कार करणार्‍या माहीमच्या एका खतरनाक गुंडाला अटक करण्यात मुंबई क्राइम ब्रँचचे सहपोलीस आयुक्त हिमांशू रॉय यांच्या पथकाला यश आले आहे.
 
मारामारी, जबरी चोर्‍या, दरोडे, बलात्कार आदी अनेक गंभीर गुन्ह्यांत सहभागी असलेला माहीमचा मोहम्मद फरीद जाफर शेख ऊर्फ फरीद मवाली (२९) याने दोन महिन्यांपूर्वी तर कहरच केला. कामांध झालेला फरीद नया नगर येथील एका घरात मध्यरात्रीच्या सुमारास घुसला. त्यावेळी सारेच झोपले होते. आपल्याकडील धारदार चॉपर काढून त्याने चक्क सर्वांना धमकावले, खबरदार कुणी आरडाओरड कराल तर! असे धमकावून त्याने निद्रिस्त असलेल्या अकरा वर्षांच्या मुलीला तिच्या आईवडिलांसमोरच उचलले. तेंव्हा कुटुंबीयांचा आक्रोश ऐकून आजूबाजूचेही लोक जागे झाले;
 
परंतु फरीद मवालीला घाबरून कुणीही पुढे आले नाही. नया नगरातील तमाम जनतेसमोर त्या लहान मुलीला नेण्यात आले; परंतु तिला वाचविण्यासाठी कुणीही पुढे आला नाही. अखेर फरीद मवालीने जवळच्याच एका बंद खोलीत नेऊन त्या बालिकेवर अमानुष बलात्कार केला.
 
 
 
 

First Published: Tuesday, July 3, 2012, 17:10


comments powered by Disqus