Last Updated: Tuesday, July 3, 2012, 22:43
www.24taas.com, मुंबई अॅन्टी करप्शन स्पेशल कोर्टानं हिरानंदानी बिल्डर विरुद्ध चौकशीचे आदेश दिले आहेत. सरकारी जमिनीचा वापर व्यावसायिक कारणांसाठी केल्याचा आरोप हिरानंदानी बिल्डरवर आरोप आहे.
पवईमधील जमिनीवर गरिबांसाठी घर बनवण्यासाठी ही जमीन हिरानंदानी ग्रुपला मिळाली होती. पण हिरानंदानी बिल्डरने तिथे मोठमोठ्या बिल्डींग उभ्या केल्यात ज्या गरिबांच्याच काय पण, मध्यमवर्गीयांच्याही आवाक्याबाहेरच्या आहेत. ही घरं श्रीमंतांना विकल्याचा आरोप हिरानंदानीवर होता. या प्रकरणी एका रिटायर्ड आयएएस अधिकाऱ्याचीही चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत.
First Published: Tuesday, July 3, 2012, 22:43