बॉम्बची बोंबाबोंब, शूटिंगसाठी होता बॉम्ब - Marathi News 24taas.com

बॉम्बची बोंबाबोंब, शूटिंगसाठी होता बॉम्ब

अंधेरीत शूटिंग बॉम्ब
www.24taas.com, मुंबई
मुंबईत अंधेरीतल्या इन्फिनिटी मॉलजवळ बॉम्बच्या फवेनं काही काळ खळबळ उडाली होती.. इन्फिनिटी मॉलजवळ बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्यानं काही काळ घबराट उडाली होती.. घटनेचं वृत्त कळताच तातडीनं बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झालं..
 
मात्र हा बॉम्ब नसल्याचं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं. सिनेमाच्या शूटिंगसाठी वापरण्यात आलेला समोर बॉम्ब सल्याचं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. इन्फिनिटी मॉलबाहेर नकली बॉम्ब असल्याचे आढळून आले.
 
बॉम्बशोधक पथकाने पाहणी केल्यानंतर त्यांना आढळले की हा खरा बॉम्ब नाहीये. मात्र या खोट्या बॉम्बने नागरिकांची चांगलीच भंबेरी उडवली होती. तो बॉम्ब खरा नसल्याचा पोलिसांनी खुलासा केल्यानंतर साऱ्यांचाच जीव भांड्यात पडला. सिनेमाच्या शूटिंगसाठी नकली बॉम्ब आणला गेला होता. नकली बॉम्बमुळे काही काळ खळबळ उडाली होती.  'त्या' फिल्मी बॉम्बने  मात्र चांगलीच 'बॉम्ब'बोंब केली.
 
 
 

First Published: Wednesday, July 4, 2012, 19:02


comments powered by Disqus