मुंबईत पाऊस सुरूच, हाय टाईडचा धोका - Marathi News 24taas.com

मुंबईत पाऊस सुरूच, हाय टाईडचा धोका


www.24taas.com, मुंबई
 
मुंबई आणि परिसरात पावसाचा जोर कायम आहे. दादरच्या हिंदमाता परिसरात पाणी साचलं आहे. तसंच आज मुंबईच्या समुद्रात मोठी हाय टाईड असून लाटांची उंची ४.८३ मीटर्स असणार आहे. दुपारी १.३४ मिनिटांनी ही भरती असणार आहे.
 
मुंबईत सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक वळविण्यात आली आहे. तर पावसाची संततधार रात्रभर सुरूच आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडेही उन्मळून पडली आहेत. परळ भागातील पॅनेस्युला बस स्टॉपवर झाड कोसळलं. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेलं नाही. मात्र बस स्टॉप पूर्णपणे उद्धवस्त झाला आहे.
 
काल रात्रीपासून वांद्रे, परळ, लालबाग, दादर, महालक्ष्मी, चेंबूर, वरळी या भागात पाऊस पडला. त्यामुळे या भागात पाणी साचले आहे. मान्सून लांबल्याने मुंबईकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार होते. पण गेल्या दोन दिवसात समाधानकारक पाऊस झाल्याने तुर्तास तरी मुंबईकर सुखावले आहेत.
 
 

First Published: Thursday, July 5, 2012, 10:09


comments powered by Disqus