हिरानंदानी बिल्डर घोटाळेबाज, गुन्हा दाखल - Marathi News 24taas.com

हिरानंदानी बिल्डर घोटाळेबाज, गुन्हा दाखल

www.24taas.com, मुंबई
 
महाराष्ट्र लाचलुचपत विभागानं बिल्डर निरंजन हिरानंदानी आणि नागरी विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव टी.सी.बेन्जामीन यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सरकारी जमीन व्यावसायिक कारणांसाठी वापरल्याचा हिरानंदानी बिल्डरवर आरोप आहे.
 
पवईमध्ये हिरानंदानी बिल्डरला सरकारी जमीन देण्यात आली होती. त्यावर गरिबांसाठी घरे बांधण्याचं बंधन होतं. मात्र त्याचं पालन केलं नाही असा बिल्डरवर आरोप आहे. त्याला बेंजामिन यांनीही मदत केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पवईचा हा जमीन घोटाळा हा ३० हजार कोटींचा असल्याचा दावा RTI कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी केला आहे.
 
हिरानंदानी बिल्डर्सवर कारवाई जरी करण्यात आली असली तरी अवघ्या ९२ रुपयांत पवईसारख्या हायप्रोफाईल भागातील २३० एकर जमीन लाटणाऱ्या हिरानंदानींवर कारवाईचा बडगा उगारण्याचं भान सरकारला तब्बल २३ वर्षानंतर आलं आहे.
 
 
 

First Published: Friday, July 6, 2012, 08:35


comments powered by Disqus