बेळगावप्रश्नी उद्धव ठाकरे आक्रमक - Marathi News 24taas.com

बेळगावप्रश्नी उद्धव ठाकरे आक्रमक

www.24taas.com, मुंबई
 
बेळगावप्रश्नी आज शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी बेळगावच्या महापौर आणि नगरसेवक त्यांच्याबरोबर होते. राज्य सरकारनं बेळगावप्रश्नी ठोस भूमिका घ्यावी, यासाठी राज्यपालांनी सरकारवर दबाव टाकावा, अशी विनंती उद्धव ठाकरेंनी केली आहे.
 
बेळगावकरांचं शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान आणि राष्ट्रपतींचीही एका आठवड्याच्या आत भेट घेणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे.कर्नाटक सरकारच्या बेळगाव महापालिकेच्या बरखास्तीच्या निर्णयाविरोधात पाठिंबा मिळवण्यासाठी बेळगावचे मराठी नेते सध्या महाराष्ट्र दौ-यावर आहेत. आज बेळगावच्या महापौर आणि नगरसेवकांनी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांची भेट घेतली. सुमारे तासभर त्यांनी बाळासाहेबांशी चर्चा केली.
 
यावेळी शिवसेना शेवटपर्यंत सीमावासियांच्या पाठिशी राहिली असं आश्वासन बाळासाहेबांनी सामीवासियांना दिलं. 15 डिसेंबर 2011ला बेळगाव पालिका कर्नाटक सरकारनं बेकायदेशीरपणे बरखास्त केली होती. त्यानंतर कन्नड विरूद्ध मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. या धर्तीवर बेळागावच्या मराठी नेत्यांनी आपला लढा अधिक भक्कम करण्यासाठी तयारी सुरू केलीय. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी शिवसेनाप्रमुखांची भेट घेतली.
 
व्हिडिओ पाहा..

First Published: Sunday, July 8, 2012, 19:54


comments powered by Disqus