'तत्काळ' तिकीटांसाठी नवे नियम - Marathi News 24taas.com

'तत्काळ' तिकीटांसाठी नवे नियम

www.24taas.com, मुंबई 
 
रेल्वे तिकीटांचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि दलालांना चाप बसवण्यासाठी तत्काळ तिकिटाच्या नियमांत आजपासून नवे नियम लागू होणार आहेत.
 
तत्काळ तिकीट योजनेत एजंट काळाबाजार करत असल्याच्या तक्रारी होत्या. त्याची दखल घेऊन रेल्वे मंत्रालयाने हे बदल केलेत. त्यानुसार दुसऱ्या दिवशीच्या ट्रेनसाठी सर्व संगणकीकृत आरक्षण काउंटर आणि विना आरक्षण तिकीट काउंटरवर सकाळी १०.०० ते १०.३० या वेळात तत्काळ तिकीटांचे बुकिंग होईल. यावेळी इतर तिकीटं दिली जाणार नाहीत. जर तत्काळ तिकीट घेणारा नसेल तरच इतर तिकीटं दिली जातील. दुसऱ्या दिवशीच्या गाड्यांचे सकाळी १०.०० ते १०.१५ या काळात इंटरनेटवरून तत्काळ बुकिंग बंद ठेवलं जाणार असल्याचं पूर्व रेल्वे प्रवक्ते समीर गोस्वामी यांनी सांगितलं.

First Published: Tuesday, July 10, 2012, 10:33


comments powered by Disqus