बहिरा राष्ट्रीय प्राणी कोण, तर मनमोहन सिंग- बाळासाहेब - Marathi News 24taas.com

बहिरा राष्ट्रीय प्राणी कोण, तर मनमोहन सिंग- बाळासाहेब

www.24taas.com, मुंबई
 
पंतप्रधान मनमोहन सिंग यांना टाईम मॅगेझिननं अंडर अचिव्हर म्हणून संबोधल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनीही आपल्या ठाकरी शैलीत सिंग यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ' मनमोहन सिंग हे जागतिक पातळीवरील एक हास्यास्पद प्राणी बनले आहेत, म्हातारा नवरा गमतीला अशी त्यांची अवस्था झाली आहे, बहिरा राष्ट्रीय प्राणी कोण, तर 'मनमोहन सिंग'! असा हल्ला बाळासाहेबांनी केला आहे. त्यामुळे आता त्यांनी घरी बसावं' , अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधानांना अक्षरशः हिणवलं आहे.
 
मनमोहन सिंग यांचं नेतृत्व दुबळं असून केवळी खुर्ची उबवत आहे. त्यामुळं देश अराजकतेच्या वाटेवर निघाला आहे. मनमोहन सिंग हे केवळ आर्थिक धोरणांच्याच बाबतीत नव्हे तर सर्वच बाबतीत अपयशी ठरल्याची टीकाही बाळासाहेबांनी केली आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखात बाळासाहेबांनी मनमोहन सिंग यांच्यावर निशाणा साधला आहे. 'अंडर अचिव्हर' म्हणजे नपुंसक, असा 'ठाकरी अर्थ' सांगून ते पंतप्रधानांवर तुटूनच पडले आहेत.
 
आज उसळत्या तुफानाचं नेतृत्त्व करण्यासाठी देशाला सिंहगर्जनेची आणि वाघाच्या झेपेची गरज आहे. मनमोहन सिंग यांच्याकडे त्यातील काहीच नाही. ते 'अंडर अचिव्हर' आहेत. असे सरकार फार काळ दिल्लीत राहिले, तर देश 'अंडर अचिव्हर' - म्हणजेच नपुंसक बनेल , अशी टिप्पणी बाळासाहेबांनी केले आहे.
 
 
 
 

First Published: Tuesday, July 10, 2012, 11:13


comments powered by Disqus