Last Updated: Tuesday, July 10, 2012, 14:29
www.24taas.com, मुंबई स्त्रीभ्रूण हत्येला जबाबदार असणाऱ्यांविरोधात आता मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार आहे. या संदर्भात राज्य सरकार केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार आहे. आरोग्यमंत्री सुरेश शेट्टींनी विधानसभेत ही माहिती दिलीय.
बीडच्या डॉ. सुदाम मुंडेचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर प्रशासनानं महाराष्ट्रभर सोनोग्राफी सेंटर्सवर धाडी टाकण्याचा सपाटा सुरू लावलाय. पण, यासंबंधी कठोर कायदा करण्याची गरज आता प्रशासनालाही भासू लागलीय. यासाठी आरोग्यमंत्रालयाकडून स्त्री भ्रूण हत्येला जबाबदार असणाऱ्यांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा प्रस्ताव दाखल करण्यात आलाय. हा प्रस्ताव राज्य सरकार लवकरच केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवणार आहे. गर्भलिंग निदान करण्यास भाग पाडणारे नातेवाईक आणि गर्भपात करणारे डॉक्टर्सच्या विरोधात कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली होती.
First Published: Tuesday, July 10, 2012, 14:29