केरोसिनचा काळाबाजार - देशमुखांची कबुली - Marathi News 24taas.com

केरोसिनचा काळाबाजार - देशमुखांची कबुली

www.24taas.com, मुंबई
 
राज्यात केरोसिन वाटपात मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरू असल्याची कबुली अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनी विधानसभेत दिलीय.
 
विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. आज विधानसभेत अनिल देशमुखांनी दिलेल्या कबुलीमुळं रॉकेल माफियांना रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याचं समोर आलंय. ग्रामीण भागात गरीबांना केरोसिन मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत विरोधक आणि सत्ताधारी आमदारांनी सरकारला धारेवर धरले. त्यावर उत्तर देताना देशमुख यांनी राज्यात केरोसिन वाटपात घोटाळा सुरू असल्याचं मान्य केलं. आमदारांची आक्रमता पाहून हा प्रश्न राखून ठेवण्यात आला असून यावर नंतर चर्चा करण्यात येणार आहे.

First Published: Tuesday, July 10, 2012, 14:38


comments powered by Disqus