Last Updated: Wednesday, July 11, 2012, 12:07
www.24taas.com, मुंबई मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेनं काल रात्री उशीरा चेंबूरच्या गोल्डस्मिथ बारवर छापा टाकला. यावेळी सहा बारबालांना ताब्यात घेण्यात आलंय.
समासेवा शाखेची गेल्या तीन दिवसांतली ही दुसरी कारवाई आहे. तीन दिवसांपूर्वी मालाडमध्ये सरगम बारवर छापा टाकला गेला होता. यावेळी १४ बारबालांना ताब्यात घेण्यात आलं होतं. यानंतर काल रात्री चेंबूरमधल्या गोल्डस्मिथ या बारवर फिल्मी स्टाईलमध्ये पोलिसांनी छापा टाकला. बोगस ग्राहक पाठवून पोलिसांनी या ठिकाणी सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. यावेळी सहा बारबालांना ताब्यात घेण्यात आलंय तर १५ ग्राहकांना दंड ठोठावण्यात आलाय. बारचा कॅशियर आणि मॅनेजरच्या विरोधात पीटा अंतर्गत कारवाई करण्यात आलीय.
First Published: Wednesday, July 11, 2012, 12:07