Last Updated: Wednesday, July 11, 2012, 16:32
www.24taas.com, मुंबई 
मुंबईत अमली पदार्थाची तस्करी करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अमली पदार्थ विकणाऱ्या टोळी विरूद्घ मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. पण अमली पदार्थाची तस्करी कशी केली जाते. हे जर तुम्हांला कळलं तर तुम्हीही चक्रावून जाल. अमली पदार्थाची तस्करी करणार्या जिगोजिया ओकुक्यू (३८) या नायजेरीयन नागरिकाला अमली पदार्थविरोधी पथकाच्या आझाद मैदान युनिटने अटक केली. अंतरवस्त्रामध्ये जिगोजिया याने कोकेन लपविले होते.
त्याच्याकडून ५० ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले असून आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे ३० लाख आहे. विशेष म्हणजे खास पद्धतीने खिसे शिवून बनविण्यात आलेल्या मस्जिद बंदर येथील युसूफ मेहेरअली रोडवर एक इसम कोकेन विकण्यासाठी येणार असल्याची माहिती आझाद मैदान युनिटला मिळाली होती.
जिगोजिया संशयास्पदरीत्या फिरताना त्यांच्या नजरेस पडला आणि पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले.१७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
First Published: Wednesday, July 11, 2012, 16:32