राज्यात आता गुटखा बंदी - Marathi News 24taas.com

राज्यात आता गुटखा बंदी

www.24taas.com, मुंबई
 
राज्यात गुटखा बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळं राज्यात आता गुटख्याच्या विक्री आणि उत्पादनावर बंदी आली आहे.
 
लवकरच याबाबतची घोषणा होणाराय. गुटख्यावर बंदी आणणारे महाराष्ट्र हे चौथे राज्य आहे. मध्य प्रदेश, केरळ आणि बिहार या तीन राज्यांत गुटख्यावर बंदी आणलीय. या निर्णयामुळं सरकारचे १०० कोटींचा महसूल बुडणाराय. गुटखा बंदीचा निर्णय घेण्यात तारीख सरकार लवकरच जाहीर करणार आहे.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या युवती मेळाव्यात गुटख्यावर बंदी घालण्यात येईल, असं आश्वासन दिलं. याआधी राज्य सरकारने २००४ मध्ये एक आदेश जारी करुन शाळा, कॉलेजच्या ५०० मीटर परिसरात गुटख्याच्या विक्रीवर बंदी घातली होती. पण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही बंदी उठवण्यात आली. पण केंद्र सरकारद्वारे कायद्यामध्ये बदलाच्या पार्श्वभूमीवर बंदीच्या निर्णयावर अंमलबजावणी होणार आहे.
 
महाराष्ट्रात फक्त एका महिन्यात ३०० कोटींच्या गुटख्याचं सेवन केलं जात. म्हणजे एका वर्षात ३६०० कोटींचा गुटखा खाल्ला जातो. गुटख्यामध्ये प्रकृतीसाठी हानिकारक असलेलं मॅग्नेशियम कार्बोनेट आढळतं. सरकारने विविध कंपन्यांचे ११५ नमुन्यांची तपासण केली आणि त्यात ९९ टक्के गुटख्यांमध्ये मॅग्नेशियम कार्बोनेट आढळलं.
 
गुटखाबंदी करणारं महाराष्ट्र हे तिसरं राज्य आहे. याआधी केरळ आणि मध्य प्रदेशमध्ये गुटका तसंच पान मसाल्यावर बंदी घातली आहे.  महसुलापेक्षा जनतेचं आरोग्य महत्त्वाचं असल्याची भूमिका सरकारने घेतल्याचं चित्र आहे. मात्र गुटख्यावर जरी बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी सिगरेटवर बंदी घालण्याचा सरकारचा तूर्तास तरी विचार नाही.

First Published: Wednesday, July 11, 2012, 22:06


comments powered by Disqus