'जीव्हीके'विरोधात खासगी विमान ऑपरेटर्स - Marathi News 24taas.com

'जीव्हीके'विरोधात खासगी विमान ऑपरेटर्स

www.24taas.com, मुंबई
 
मुंबई विमानतळावर पार्किंग चार्ज लावण्याच्या जीव्हीके कंपनीच्या निर्णयाविरोधात खासगी विमान ऑपरेटर्स एकत्र आले. जीव्हीके आणि ऑपरेटर्समध्ये बुधवारी झालेल्या बैठकीत, पार्किंग चार्जेस हजारावरून पंधरा हजार रूपये करण्यावर नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यावर पार्किंग चार्ज हटवण्याच्या मागणीवर विचार करण्याचं आश्वासन कंपनीकडून देण्यात आले.
 
जीव्हीके कंपनीला मनमानी पद्धतीनं पार्किंगचे चार्ज वाढवण्याची परवानगी नागरी उड्डयन मंत्रालय किंवा कोणत्याही सरकारी संस्थेकडून मिळालेली नाही. मुंबई कॉर्पोरेट हब असल्यानं ऑपरेटर्सना इथं पार्किंग स्पेस हवा असतो. काही निवडक एअरलाइन्स कंपन्यांना अनेक महिन्यांपासून जागा देण्यात आली आहे. आणि त्या कंपन्या विमानांचा वापरही करत नसल्याचं निदर्शनास आलंय.
 
जीव्हीके कंपनीनं दिलेलं आश्वासन कधी पूर्ण होणार याची आता ऑपरेटर्स प्रतीक्षा करताहेत. मात्र यात जर तोडगा निघाला नाही तर केंद्र सरकारनं यात दखल देण्याची मागणी पुढे येऊ शकते.
 

First Published: Thursday, July 12, 2012, 18:47


comments powered by Disqus