Last Updated: Thursday, July 12, 2012, 19:01
www.24taas.com, मुंबई विधान परिषद निवडणुकांचे उमेदवार ठरवण्यासाठी, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दिल्लीला रवाना झाले आहेत. पक्षश्रेष्ठींशी चर्चा करुन ते विधान परिषदेसाठी उमेदवार ठरवणार आहेत. माणिकराव ठाकरे हे आधीपासूनच दिल्लीत आहेत.
राष्ट्रवादीत चढाओढविधान परिषदेचे राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. बीड जिल्ह्यातील भाजपचे माजी आमदार आणि आता राष्ट्रवादीचे नेते असलेल्या अमरसिंह पंडितांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांना तिकीट मिळालय. तर पुण्याचे राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष जयदेव गायकवाड यांनाही उमेदवारी देण्यात आलीय. अरुण गुजराथी आणि उषा दराडे यांचा पत्ता पक्षानं कट केला आहे.
First Published: Thursday, July 12, 2012, 19:01