मध्य रेल्वेचे डबे रुळावरून घसरले... - Marathi News 24taas.com

मध्य रेल्वेचे डबे रुळावरून घसरले...

www.24taas.com, मुंबई
 
रात्री उशिरा कर्जतहून सीएसटीकडे जाणाऱ्या एका लोकलचे तीन डबे  सीएसटी स्टेशनजवळ घसरले. सुदैवाची गोष्ट म्हणजे रात्री उशिराची वेळ असल्यानं ट्रेनमध्ये फारसे प्रवासी नव्हते.
 
पावसाळा सुरू झालाय. ट्रॅकवर पाणी साठणं, ट्रेन बंद पडणं, सिग्णल यंत्रणेत बिघाड होणं या गोष्टी मुंबईकरांसाठी नव्या राहिल्या नाहीत. पण, गुरूवारी रात्री मध्य मार्गावरून सीएसटीकडे जाणाऱ्या लोकलचे दोन डबे घसरले. दोन तासांच्या प्रयत्नानंतर हे डबे पूर्ववत करण्यात आले. या घटनेची चौकशी केली जाईल असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. रात्री उशीराची वेळ असल्यानं गाडीत वर्दळ नव्हती. पण, हेच दिवसा घडलं असतं तर... ही कल्पना न केलेलीच बरी. पण, रेल्वे प्रशासन मात्र या घटनेमुळे खडबडून जागं झालंय.

First Published: Friday, July 13, 2012, 08:46


comments powered by Disqus