Last Updated: Friday, July 13, 2012, 09:26
www.24taas.com, मुंबई जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी वेगवेगळ्या कंपन्यांची स्थापना करून त्यामाध्यमातून हवाला आणि मनी लॉन्ड्रींगचे व्यवहार केल्याचा घणाघाती आरोप देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलाय.
तटकरे कुटुंबीयांनी ‘मनी लॉन्ड्रीग’च्या माध्यामातून अनेक अवैध व्यवहार केल्याची माहिती फडणवीस यांनी पुराव्यानिशी दिली आहे. तशी तक्रारही इकॉनॉमिक्स ऑफेन्स विंग यांच्याकडे केली गेली आहे. मात्र, अजूनही यासंबंधी काहीच कारवाई कशी झाली नाही? तटकरेंवर गुन्हा का नोंदवला जात नाही? असा प्रश्न फडणवीस यांनी सभागृहात सरकारला विचारलाय. तटकरेंना वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय.
First Published: Friday, July 13, 2012, 09:26