Last Updated: Friday, July 13, 2012, 14:55
www.24taas.com, मुंबई राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर विरोधकांनी उपस्थित केलेल्या चर्चेला गृहमंत्री आर. आर. पाटील आज उत्तर देणार आहेत.
विधानसभेत काल कायदा सुव्यवस्थेच्या चर्चेत विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी पोलीस विभागाचे वाभाडे काढले होते. पोलिसांसाठी खरेदी केलेल्या स्पिड बोटी आणि अत्याधुनिक गाड्यांच्या खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खडसे यांनी केला होता. त्याचबरोबर जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांचा मुलगा अनिकेत तटकरे यांची सीआयडीकडून चौकशी व्हावी, अशी मागणी भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली होती. या सर्व आरोप आणि प्रश्नांवर गृहमंत्री आज विरोधकांना उत्तर देतील.
First Published: Friday, July 13, 2012, 14:55