गेटवेच्या समुद्रात तरूणाने मारली उडी.... - Marathi News 24taas.com

गेटवेच्या समुद्रात तरूणाने मारली उडी....

www.24taas.com, मुंबई
 
मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ एका २२ वर्षाच्या युवकाने समुद्रात उडी मारली. नेव्हीच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने या युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.  दुसरीकडे गोराई बिचवर ३ तरुण आणि एक तरुणी फिरावयासाठी गेले असता समुद्रात बुडाले.
 
हे सर्वजण ठाण्याच्या जीएसएस कॉलेजचे विद्यार्थी आहेत. पोलिसांना यातल्या एका मुलाचा आणि मुलीचा मृतदेह मिळाला असून अन्य जणांचा शोध घेण्यात येतोय. तर एका तरुणाला भगवती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
 
सुजाता पाटील आणि आशिष अशोक चव्हाण या दोघांचा मृत्यू झाला. तर तुषार म्हसकर याला भगवती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. निरंजन सिंहचा शोध अद्याप सुरू आहे.
 
 
 

First Published: Friday, July 13, 2012, 22:17


comments powered by Disqus