Last Updated: Saturday, July 14, 2012, 00:07
www.24taas.com, मुंबई 
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतली. ‘मातोश्री’वर झालेल्या या ऐतिहासिक भेटीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं मुखर्जींना पाठिंबा दिला आहे. एनडीएने आपला अधिकृत उमेदवार जाहीर करण्याच्या आधीच सेना मुखर्जींच्या पाठिशी ठाम उभी राहिली.
या पाठिंब्याबद्दल आभार मानण्यासाठी मुखर्जी मातोश्रीवर दाखल झाले. पण या पाठिंब्याच्या बदल्यात शिवसेना अनेक राजकीय फायदेही मिळवेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली यासंबंधी सविस्तर प्रतिक्रिया देण्यास शिवसेनाप्रमुखांनी नकार दिला.
First Published: Saturday, July 14, 2012, 00:07