Last Updated: Saturday, July 14, 2012, 11:45
www.24taas.com, मुंबई मुंबईतली गोविंदा पथकं आणि गणेश मंडळांच्या स्वयंसेवकांना आता विम्याचं संरक्षण मिळणार आहे. मुंबई महापालिकेनं दहीहंडीवेळी अपघातग्रस्त झालेल्या गोविंदांचा विमा काढण्याचा निर्णय घेतलाय.
गणेशोत्सव आणि कृष्ण जन्माष्टमी हे सण मुंबईत मोठ्या उत्साहात साजरे होतात. दहीहंडीच्या वेळी एकापेक्षा एक मोठे थर रचण्यासाठी गोंविदा पथकात चुरस लागते. मात्र, हे थर रचताना अनेकदा अपघातही झालेत. गेल्या वर्षी नऊ थरांचा विक्रम रचताना मोठ्या प्रमाणात गोंविदा जखमी झाले होते. या गोविंदाना तुटपुंजी मदत खाजगी संस्थाच्या विम्यामुळे झाली होती. यापुढे मात्र असा प्रसंग ओढवलाच तर मुंबई महापालिकेनं या गोविंदांना विम्याचं संरक्षण देण्याचा निर्णय घेतलाय. अपघातग्रस्त गोविंदा आणि गणेश मंडळातील स्वयंसेवकाना विसर्जनावेळी अपघात घडला तर विम्याची मदत मिळावी यासाठी मुंबईच्या महापौरांनी पालिका आयुक्ततांकडे एक प्रस्ताव ठेवण्यात आल्याची माहिती मुंबईचे महापौर सुनिल प्रभू यांनी दिलीय.
या निर्णयाच मुंबईतील गोविंदा पथकांनी स्वागत केलंय. मात्र जखमी गोविदांना मिळणाऱ्या विमा रकमेत वाढ करावी, अशी मागणी गोविंदा पथकांनी केलीयं. अपघातग्रस्त गोविंदांसह गणपती विसर्जनादरम्यान अपघात घडल्यास अशा स्वयंसेवकांनाही विम्याचं संरक्षण देण्यात येणार आहे.
First Published: Saturday, July 14, 2012, 11:45