बिबट्याने पळविलेल्या मुलीचा मृत्यू - Marathi News 24taas.com

बिबट्याने पळविलेल्या मुलीचा मृत्यू

www.24taas.com, मुंबई
 
मुलुंडमध्ये  बिबट्याने उचलेल्या मुलीचा मृत्यू झाला.  नॅशनल पार्कमधून आठ वर्षांच्या संजना थोरात या मुलीला बिबट्याने पळविले होते.
 
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत असलेल्या शंकर टेकडी परिसरात, रविवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. संजना आपल्या आईसोबत जात असताना मागून आलेल्या बिबट्याने तिला उचलून नेलं. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आणि वनाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या मदतीने रात्रभर या सर्व परिसरात संजनाचा शोध घेतला. मात्र अद्याप ही मुलगी सापडलेली नाही.
 
शंकर टेकडी येथे सुनीताचे अवयव सापडले. तिचे हात आणि डोके सापडल्याची माहिती देण्यात आली. या घटनेमुळे परिसरात बिबट्याची दहशत दिसून येत आहे.

First Published: Tuesday, July 17, 2012, 09:55


comments powered by Disqus